!! दंडवत प्रणाम !!

संकलक व प्रकाशक
प.से. श्री. नानाजी ढवंगाळे

प्रकाशकाचे मनोगत

॥ श्री दत्तात्रेय प्रभू नमः॥ या मार्गासी आदिकरण श्री दत्तात्रेय प्रभूंना विनम्र अभिवंदन तसेच अच्युत गोत्रीय पंथीय बांधवास जय श्री चक्रधर. सदरर्हु पुस्तक प्रकाशनाचा हेतु असा की पंथीय बांधवांना पारायणाकरिता सुत्रपाठ, श्री दत्तात्रेय कवच, गीतेचा पंधरावा अध्याय, संकष्ट वज्रपंजरु, संकष्ट हरण स्तोत्र, संकष्ट नाशक स्तोत्र ही संपूर्ण माहिती एकाच पुस्तकात उपलब्ध व्हावी तसेच पाचही अवताराच्या प्रचलित आरत्या तसेच मराठी व हिन्दीतील भजने सुध्दा ह्या पुस्तकात असावीत अशी इच्छा काही निकटवर्तीयांनी प्रगट केल्यामुळे उपरोक्त सर्व माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे.

सुत्रपाठातील आचार प्रकरणातील आचार सुत्रांचा ग्रहस्थाश्रमातील साधकाने यथाशक्य आचार केल्यास आपली मोक्षमार्गाची वाटचाल सुलभ होऊ शकते. तसेच श्रीमद् भगवदगीतेद्वारे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी अर्जुनाला निमित्त करुन सकल मानव जातीच्या कल्याणासाठी निरुपण केलेले ब्रह्मविद्या, तत्वज्ञान तसेच श्रीकृष्ण परमात्म्याने उध्दव देवाला निरुपण केलेले मोक्षमार्गाचे ज्ञान संक्षिप्त रुपाने या पुस्तकात घेण्यात आलेले आहे.

आरती करताना धुपारती, मंगलारती, विशेषवंदन, प्रसादवंदन, देवाची उटी करताना म्हणायचा विधी यामधे दिलेला आहे. देवाला उपहार दाखविताना भिक्षुकांना अन्नदान व इतर दान करताना द्यावयाचा संकल्प विधी तसेच नामधारकाने आचरणाची महत्वाची माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे त्यामुळे साधकाला ही सर्व माहिती प्राप्त करण्यास वेगवेगळी पुस्तके हाताळण्याची गरज राहिलेली नाही. या पुस्तकात घेण्यात आलेली वेगवेगळी माहिती साधकासाठी उपयुक्त ठरेल असा मानस आहे. प्रस्तुत पुस्तकात नमुद केलेली माहिती देताना अनावधानाने काही त्रुटी अथवा चुका झालेल्या असल्यास अच्युत गोत्रीय पंथीय बांधव मला उदार अंतःकरणाने क्षमा करतील अशी आशा बाळगतो.

॥ जय श्री चक्रधर ॥